अमेरिकेत नोकरी शोधणार्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव अॅप पुण्यातील अमेय बनसोड मुळे
पुणे प्रतिनिधी – मंदार तळणीकर
अमेरिकास्थित पुणेकर तरुणाच्या कामगिरीची गुगलनेही घेतली दखल
अमेरिकेतील एम एसचे शिक्षण संपल्यावर डेस्परेट होऊन नोकरी शोधताना आलेल्या असंख्य बर्या- वाईट अनुभवांआधारे डॅनजॉब डॉट कॉम (danjob.com) हे अॅप विकसित करून अमेरिकेतील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणार्या अमेय बनसोड या पुणेकर तरुणाचे सध्या जोरदार कौतुक होत आहे.
पर्वतीतील अरण्येश्वर परिसरात राहणार्या या तरुणाने गेल्या अवघ्या सहा महिन्यात ही कामगिरी केली आहे.
बोस्टन मधील नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटीमधून एमएस होऊन बाहेर पडलेले अमेय बनसोड सहा महिन्यांपूर्वी (जून- जुलै 2024) स्वतःच नोकरीसाठी धडपडत होते. नेमकी त्याचवेळी अमेरिकेतील नोकर्यांच्या बाजारपेठेत मंदी होती. अनेकांच्या नोकर्या जात असताना अमेय नोकरी मिळविण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न करीत होते. नोकरीसाठी त्यांनी शे- दोनशे नव्हे तर तब्बल 11 हजार ठिकाणी अर्ज केले होते. हे अर्ज करताना आपल्या काय चुका झाल्या. अर्जाचे कव्हरिंग लेटर कसे हवे. गुगल ए आयच्या मदतीने तयार केेलेले कव्हर लेटर जनरेटर. रेझ्युम तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे. इंटरव्ह्यू देताना आपण नेमके कोठे चुकलो, त्यात काय सुधारणा केली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे. हे त्यांना उमगले.
या सार्या चुकांचा मागोवा घेत त्यांनी आपले हे डॅनजॉब डॉट कॉम (danjob.com) हे अॅप विकसित केले व अमेरिकेत नोकरी शोधणार्या होतकरू तरुणांच्या हाती यशाची ही गुरुकिल्ली अगदी मोफत उपलब्ध करुन दिली. पर्वती परिसरात आयोजित एका छोटेखानी कौटुंबिक कौतुक सोहळ्यात बोलताना त्यांंनी ही माहिती दिली.
सामाजिक सेवेच्या हेतूने अमेय यांनी सुुरु केलेल्या या उपक्रमाची दखल गुगलने त्यांना १५० डॉलर्सचे बक्षीस देऊन घेतली. अमेरिकेत तग धरण्यासाठी हॅकेथॉन सारख्या कोडिंग स्पर्धा क्रॅक करून बक्षीसे कसे मिळवायची आणि अर्थार्जन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शनही त्यांनी अनेकांना केले आहे. त्यांनी MIT, कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या विद्यापीठात हॅकेथॉन सारख्या कोडिंग स्पर्धा जिंकून लाखो रुपयांचे अर्थार्जन केले आहे. इतकेच नव्हे तर नोकरीच्या शोधात असलेल्या होतकरुंना मार्गदर्शन करण्यासाठी महिन्यातून चार- पाच वेळा ते मोफत ऑनलाईन सेशन्सही घेतात. अमेरिकेत करियर गायडन्सची मोठी बाजारपेठ आहे. त्यासाठी हजारो डॉलर्सचे शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत अमेय बनसोड यांचा हा उपक्रम अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठा आधारवड ठरला आहे. अमेय यांच्या अॅपला वापर आत्तापर्यंत हजारो होतकरुंनी घेतला असून त्यांच्या ऑनलाईन सेशनमधून झालेल्या मार्गदर्शनाआधारे गेल्या पाच सहा महिन्यात शेकडो विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बरोबरच नोकर्याही मिळाल्या आहेत.
गेल्या २१ तारखेला अमेयचे पहिले पुस्तक – कवितासंग्रह कविमेय भरत नाट्य मंदिर येथे प्रसिद्ध झाला. गायनाची मैफिल देखील तेव्हा आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेत विविध ठिकाणी अमेयचे भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंगाचे कार्यक्रम होत असतात.
—
चौकट
—
बार्बेडोस आयलंडसाठी बिम राईड
—–
अमेय बनसोड सध्या पेनसिल्व्हानिया गव्हर्नमेंटच्या टोल विभागात अॅप विकसित करण्याची नोकरी करतात. त्याबरोबरच बार्बेडोसचे रहिवासी स्टीवन्सन बॉइस, नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर निक ब्राउन आणि आपल्या काही मित्रांच्या मदतीने कॅरेबियन स्टेटमधील बार्बाडोस आयलंडला भेट देणार्या पर्यटकांसाठी व तेथील रहिवाशांसाठी बिम राईड हे अॅपही तयार केले आहे. बिम राईड हे उबेरसारखी पिक अप सेवा देणारे अॅप आहे. आत्तापर्यंत सहाशे ते सातशे पर्यंटक व रहिवाशांनी त्याचा वापर केला असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. तेथील सुमयारे शंभर ड्रायव्हर्स बिम राईडची सेवा पुरवितात.