अकोला:विदर्भातील शिक्षकांकडून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे जंगी स्वागत
सौ संगीता ताई शिंदे यांनी केली होते स्वागताचे नियोजन
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
दिनांक- 17 डिसेंबर 2023
शिक्षक आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर या ठिकाणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर उपस्थित आहेत, अनेक दिवसापासून विदर्भातील शिक्षकांची मागणी होती, “शिक्षकांचा आमदार शिक्षक झाल्याबद्दल ” आणि महाराष्ट्रातील शिक्षक- शिक्षकेतरांसाठी सातत्याने विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्नांवर अनुदान,जुनी पेन्शन, वाढीव पदे, अर्धवेळ शिक्षक, आयटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आरटीई शुल्क, आरटीई मान्यता, अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांची भरती, दिव्यांग शाळा, आश्रम शाळा, ठोक मानधनावरील शिक्षक, शासकीय जमीन संस्थांना मिळण्याबाबत, अनुकंप मान्यता, शालार्थ आयडी इत्यादी विषयांवर आमदार झाल्यापासून 10 महिन्यामध्ये खूप सारे कामगिरी केली, कोकण विभागातीलच नव्हे तर राज्यातील अनेक शिक्षकांची कामे सोडवण्यासाठी प्रयत्न केला,त्याबद्दल शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष सौ संगीता ताई शिंदे व विदर्भातील शिक्षकांनी अमरावतीमध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे जंगी स्वागत केले, विविध आंदोलनाच्या निमित्ताने या सर्व शिक्षकांशी निर्माण झाले ऋणानुबंध आज या स्वागतातून दिसून आले,*
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून जुनी पेन्शन सारखा विषय सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी जी धडपड केली आहे, त्याचे कौतुक राज्यातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी करताना दिसले, फटाक्याची माळ लावून, हार शाल श्रीफळ, विदर्भाचा आहेर देऊन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे स्वागत करण्यात आले, तसेच मनोगतातून आजपर्यंत केलेली कामे, यावर मार्गदर्शन केले , शैक्षणिक समस्या बाबतीत शंका कुशंका बाबत चर्चा केली, उपस्थितांना आलेल्या अडचणी विषय मार्गदर्शन केले, कार्यक्रमासाठी विदर्भातील शेकडो शिक्षक उपस्थित होते, विदर्भातील शिक्षकांनी केलेले स्वागत पाहून Shouldn’t आणि विदर्भातील शिक्षकांचे प्रेम आणि आपलेपणाची भावना यातून दिसून आले विष्णू विशे संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटन