पाचोरा येथे मा साहेब जिजाऊ जन्मोत्सव साजरा
Ma Saheb Jijau's birth anniversary celebrated at Pachora
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा -राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मॉ.साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि विधिवत पूजा करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एस.के.पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, बाजार समितीचे चेअरमन सभापती गणेश पाटील ,मार्केट कमिटी माजी संचालक दत्ताभाऊ बोरसे पाटील, विकास पाटील , डॉ. नरेश गवांदे, डॉ. स्वप्नील पाटील, ऍड .प्रवीण पाटील अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठानचे सचिव संजय पाटील, एन.आर ठाकरे , दीपक पाटील, डॉ.गोरख महाजन, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दिपक मुळे, किशोर डोंगरे , किसन सूर्यवंशी ,अशोक निंबाळकर , संदिप महालपुरे, विजय जाधव भूषण चौधरी ,पिरन पाटील आदि सह मराठा सेवा संघाचे व छ. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी खान्देशरत्न डॉ.स्वप्निल पाटील, सभापती गणेश पाटील व वकिल संघाचे नुतन अध्यक्ष ऍड. प्रविण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस्.ए.पाटील यांनी केले.