जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत जिल्हा परिषद माळेवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

First rank of Zilla Parishad Malewadi School in district level bhajan competition

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन पुणे : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.त्यामधील भजन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महूडे खुर्द- माळेवाडी तालुका भोर येथील मुलांनी प्रथम क्रमांक मिळवत पुणे जिल्ह्यात गावचे तसेच शाळेचे नाव गाजवले. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा जिल्हा महोत्सव अंतर्गत खेड येथे जिल्हा पातळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील भजन स्पर्धेत लहान गटात उत्कृष्ट भजन सादर करून भोर तालुक्यातील घेवडेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या प्राथमिक शाळा माळेवाडी च्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शाळेचा डंका पुणे जिल्ह्यात वाजवला. शिक्षणाधिकारी नाईकडे यांनी या चिमुकल्याचे कौतुक करत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे त्याचबरोबर तालुका गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी पालक उपस्थित होते. बीट च्या विस्तार अधिकारी अंजली वाडकर केंद्रप्रमुख तसेच ग्रामस्थांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. ही जिल्हा पातळीवरील स्पर्धा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका कडा संकुल तालुका खेड येथे घेण्यात आली.भजन स्पर्धेत सुरुवातीला केंद्र, बीट व त्यानंतर तालुका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत सुद्धा प्रथम क्रमांक मिळविल्याने यातील सहभागी विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांच्यावर पंचक्रोशीत तसेच तालुक्यात अभिनंदनचा वर्षा होत आहे.या भजन स्पर्धेत माळेवाडी शाळेच्या विजयात हार्मोनियम वादक कार्तिकी शिंदे पखवाज वादक अभिमन्यू जेधे आरोही कुमकर प्रतीक बदक, स्वराज गोळे, अवधूत शिंदे, प्रांजल खोपडे, धनश्री जेधे,स्वरा काटकर, आदित्य कुमकर, आयुष जेधे या विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला.ग्रुप ग्रामपंचायत महूडे खुर्द माळेवाडी च्या सरपंच सौ सोनाली दीपक कुमकर तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक भागोजी कुमकर माजी सरपंच जयसिंग अण्णा शिंदे माजी सरपंच दीपक अण्णा शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button