पाचोरा तालुका कलाध्यापक संघ कार्यकारणी जाहीर
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा तालुका कलाध्यापक संघ सहविचार सभा दि 19 /1/2025 रोजी संस्कार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आली.
सभेची सुरुवात मा.अध्यक्ष – निलेशकुमार लक्ष्मणराव कुमावत (पी.डी. बडोला मा. वी. वरखेडी )यांनी केलेल्या कार्याचा उजाळा मांडला. कला संघटना हिच कलाध्यापकांच बळ वाढवत असते असे मत कुमावत सरांनी मांडले.
कलाध्यापक संघांचे मा.सचिव सुबोध मुरलीधर कांतायन(श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा)यांनी सर्व कलाध्यापकांमुळेच पाचोरा तालुका कलाध्यापक संघ मजबूत झाला व विविध कलात्मक उपक्रमांमध्ये सर्वांची साथ मिळाली. असे मत कांतायन सरांनी मांडून, विविध विषयांवर सर्वांनी चर्चा केली.
दि.8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलाशिक्षकांच्या अधिवेशनास जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी जाहिरात व लेख देण्यासंबंधी माहिती देण्यात आली. अधिवेशनास उपस्थित राहण्यासंबंधी कला शिक्षकांनी सहमती दर्शवली. 1जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर2026 पर्यंत पाचोरा कलाध्यापक संघाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून मनोज रंगलाल जाधव यांची व , सचिव म्हणून विजय बळवंतराव पाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली सोबतच कार्याध्यक्ष- प्रशांत मालकर, सहसचिव -चेतन पाटील, कोषाध्यक्ष -ललित बडगे, सहकार्यध्यक्ष -भगवान परदेशी, प्रसिद्धीप्रमुख- प्रमोद पाटील, स्पर्धाप्रमुख- संदीप पाटील ,उपाध्यक्ष- स्वप्नील पाटील, गणेश आगळे, प्रशांत सोनवणे, संदीप वानखेडे, प्रदीप सोनार,
सल्लागार -अशोक सोनार, सुनील भिवसने, परशुराम पवार, सुनील लोहार याची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले . आभार प्रदर्शन प्रदीप सोनार यांनी मानले.