माध्यमिक विद्यालय पिंप्री ( सार्वे ) वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

आबा सूर्यवंशी (जळगांव जिल्हा प्रतिनीधी)

पाचोरा -दि.२० जाने. रोजी माध्यमिक विद्यालय पिंप्री( सार्वे ) येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादासो. निखिल दिलीप पाटील उपाध्यक्ष, तुळजाई शिक्षण मंडळ यांनी भूषविले. मुख्याध्यापक किरण पाटील तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक माध्यमिक संघ यांच्या सह कार्यक्रमास तुळजाई शिक्षण मंडळाचे सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक , पिंप्री, सार्वे, सातगाव, नांदगाव तांडा , नांदगाव, शिंदाड येथील सर्व आजी- माजी सरपंच व उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात पार पडला. सूत्रसंचालनची धुरा गुलाबराव पाटील सर यांनी तर शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील सर यांनी प्रेक्षकांचे व मान्यवरांचे आभार मानले. संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button