Akola news:आसेगाव बाजार येथे कायदेविषयक शिबीर संपन्न,तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम
अकोट:-तालुक्यातील ग्राम आसेगाव बाजार येथे जागतिक आरोग्य दिनी (दि.२५ रोजी) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमास चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती अकोट, विनायक एम. रेडकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर,सुरेंद्र पोटे, (अध्यक्ष विधीज्ञ संघ) सतिष उगले (उपाध्यक्ष) विजय चव्हाण, (सचिव) विधीज्ञ वर्ग न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाला जागतिक आरोग्य दिवस जागतिक वसुंधरा दिवस, पि.सी. अॅन्ड पि.एन.डी.टी. कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, मुलभूत हक्क व अधिकार याविषयी कायदेविषयक माहिती देण्यात आली,कार्यक्रमाला,वक्ते म्हणून अॅड. राहुल वानखडे अँड. महेश देव, प्रा.डॉ मेघना पोटे,अँड, सुशिल खवले, अॅड. ए. पी उकर्डे या वक्त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात शेकडो लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता विजय जितकर (सामाजिक कार्यकर्ते) अकोट,मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय आसेगाव बाजार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.
यावेळी सूत्र संचालन
अॅड. हर्षलता नाथे, प्रास्ताविक अॅड. गजानन पुंडकर,(उपाध्यक्ष श्री.शिवाजी शिक्षण संस्था) तर आभार अॅड. वसु, यांनी मानले,
जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट