जारगाव सुदामा रेसिडेन्सी नागरिकांच्या मागण्या मंजुरीचे आश्वासन ?,आ.किशोर आप्पा पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता!
Jargaon Sudama Residency citizens seek assurance regarding approval?
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – जारगाव येथील
सुदामा रेसिडेन्सी च्या रहिवाशी नागरिकांना सुरु असलेले अवैध कारखादारी, दोन नंबरचे उद्योगधंदे आणि वाढत असलेले अतिक्रमण याच्या वर कार्यवाही आणि या भागातील नागरीकांच्या मूलभूत सुविधा , गटार,रस्ता
सांडपाणी व्यवस्था मिळावे या संदर्भात सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांनी व या परिसरातील रहिवासी ग्रामस्थानी त्यांच्या मागण्या बाबत या पूर्वी देखील समस्या संदर्भात संबधित विभागातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन, आंदोलन , लाक्षणिक उपोषण केले. मात्र प्रशासनाचा आडमुठे पणा आणि सतत होणाऱ्या दुर्लक्ष मुळे या समस्या सुटत नव्हत्या. शेवटी २४ पासून किशोर डोंगरे व या भागातील रहिवासी नागरिकांनी तहसील कार्यालया समोर लोकशाही मार्गाने गेल्या चार दिवसा पासून आमरण उपोषण सुरु केले होते. नागरिकांच्या मागण्यांचा विचार करत
दि.२७ जानेवारी रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दाखल घेतली व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन उपोषण करणाऱ्या नागरिकांना दिले.आणि उपोषणाची सांगता करण्यात आली. तसेच जारगाव ग्राम पंचायत चे ग्रामसेवक यांनी कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले आहे. या वेळी प्रांताधिकारी भुषण आहिरे , पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.बोरसे , तहसीलदार श्री. बनसोडे, डीवायएसपी धनंजय येरुळे , पोलिस निरीक्षक अशोक पवार , जारगाव ग्रामसेवक व जारगाव ग्रामस्थ उपस्थित होते.