भरधाव ट्रॅक्टरने १० वर्षीय बालकाला चिरडले, पाचोरा शहराच्या शक्तिधाम कॉलनीतील घटना 

पाचोरा प्रतिनीधी – भरधाव ट्रॅक्टर खाली चिरडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील भडगांव रोडवरील शक्तिधाम कॉलनीत घडली आहे.दिनांक १३ डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील शक्तीधाम कॉलनीत घरासमोर खेळणारा रुद्र जितेन्द्र गोसावी हा १० वर्षीय बालक भरधाव ट्रॅक्टर खाली चिरडला गेला. ट्रॅक्टर चालका विरुद्ध मयत बालकाचे वडील जितेंद्र गोसावी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला बबलू नामक युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.

Related Articles

Back to top button