Akola news:मोहाळा येथे स्वच्छता पंधरवाडा एक तारीख एक तास श्रमदान”उपक्रम संपन्न

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

– आज रविवार १ ऑक्टोबर 2023 रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा
येथे “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम राबविण्यात आला.शालेय शिक्षण विभाग,भारत सरकार यांनी निर्देशित केल्या नुसार या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.शालेय परिसर व शाळे जवळील परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली.या नंतर ग्राम पंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.
ग्राम पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पर्जन्यधारांनीही हजेरी लावली. त्यामुळे उपस्थितांचा उत्साह वाढला होता. सरपंच वंदना पळसपगार यांच्या
उपस्थित मान्यवर या प्रसंगी उपसरपंच इमरान पटेल, ग्राम सदस्य मो.शफीक, योगेश वानखडे, मजीद खान,जमीर खान, अहमद जमा,अय्युब बेग , मुस्ताक पटेल , अब्दुल फिरोज पोस्टमन गणोरकर, उषा धुंदे, सामाजिक कार्यकर्ते अन्सार मामु, अब्दुल लुकमान तंटामुक्ती अध्यक्ष अफजल खान
,कर्मचारी राम वानखडे,फरिदोड्डीन, दिनकर नेरकर,उर्दू शाळेचे शिक्षकवर्ग,मराठी शाळेचे शिक्षक,शाळा समितीचे अध्यक्ष,गावातील नागरिक, विद्यार्थी ,
पोलीस पाटील वर्षा सोनवणे
गसदस्य व गावाची आशा वर्कर
फरजाना बी कोतवाल
आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरु असलेल्या पर्जन्यधारांनी उपस्थितांचा उत्साह वाढला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button