पाचोऱ्यात : बदरखे येथे वडिलांच्या पार्थिवाला लेकीने दिला मुखाग्नी
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा तालुक्यातील बदरखे गावातील लक्ष्मण पुंडलिक बकले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने लेकीने पुढाकार घेत वडिलांचे अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय घेतला. स
पाचोऱ्यातील बदरखे गावात जुन्या रूढी-परंपरांना मूठ-माती देत अवघ्या १३ वर्षीय मुलीनेच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले.
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील शेतकरी लक्ष्मण पुंडलिक बकले (वय ४६) यांना मागील काही दिवसापूर्वी रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, त्यांची तब्येत जास्त बिघडली ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना मुंबईत नेण्यात आले मात्र तेथे उपचार दरम्यान त्यांचा ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे घरी आणण्यात आले. वडिलांचे दुर्दैवी निधन झाले आणि पत्नी आणि मुलींच्या डोक्यावरील बापाचे छत्रही हरपले. मुलगा नसल्याने या बापाला अग्नी देणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. पण न डगमगता मृताचे लहान भाऊ सदाशिव बकले यांनी पाठिंबा देऊन एकुलती एक मुलगी दीपालीला मुखाग्नी देण्यासाठी पुढे आणले आणि अंत्यविधीचे सर्व कार्य पूर्ण केले. समाज सुधारतोय अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी मुलगा हवाच, असे मानणारा समाज आता मुलींनी अंत्यसंस्कार करण्याच्या कृत्याचे समर्थन करत आहे, ही बाब नोंद घेण्याजोगी आहे. या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या लेकिंनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या लेकिंनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.