पाचोरा भारतीय जैन संघटना तर्फे कॅन्सर शिबिर तज्ञ डॉ. निलेश चांडक जळगाव यांनी कॅन्सर आजारावर केले मार्गदर्शन !
Cancer Camp by Pachora Bharatiya Jain Sanghatana Expert Dr. Nilesh Chandak, Jalgaon, Cancer Azavar Banana Guidance!
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा येथील भारतीय जैन संघटना तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी आरोग्य तपासणी तसेच समाजातील विविध घटकासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मदत करण्यासाठी भारतीय जैन संघटना नेहमी अग्रेसर असते. जैन संघटना धार्मिक संस्था असून कोणतेही कार्यक्रम किंवा सामाजिक कार्य, आपत्कालीन घटना घडल्यास ही संघटना पुढे येऊन जात पातीचा भेदभाव न करता ही संस्था काम करीत असते. संस्था गुरु महाराजांचा आदर करून त्यांनी जनहितासाठी दिलेल्या शिकवणीचे पावलों पावली काम करून गोरगरीब ,दिनदुबळे गरजूंना मदतीचा हात देत असते. त्यामुळे भारतीय जैन संघटना जगात नावलौकिक मिळवून आहे. नुकतेच पाचोरा येथे भारतीय जैन संघटना तर्फे कॅन्सर या आजारावर कसा मात करावा निष्णांत व तज्ञांमार्फत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. समाजाचे ज्येष्ठ रतनशेठ संघवी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ. निलेश चांडक यांनी मार्गदर्शनात सांगितले की, कॅन्सर आजार मोठया प्रमाणात वाढत आहे. रूग्णांनी खचून व घाबरून न जाता या दूर्धर आजारावर कशी मात करावी या बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच शहरातील नामांकित डॉ. अनिल झवर यांनी सांगितले की कॅन्सर आजारातून मुक्त होऊ शकतो वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितले प्रमाणे उपचार घेणे गरजेचे आहे. डॉ. जयवंतराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कॅन्सर हा अनेक प्रकारचा आहे त्यामुळे त्याला घाबरून जाऊ नये फक्त आपण काही अटीचा पालन करा कुठलेही व्यसन न करता आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी नेहमी आहार वेळेवर घ्यावा शक्यतो व्यायाम नेहमी करावा रोज सकाळी फिरावे नेहमी हसतमुख राहावे म्हणजे आपण सर्व आजारातून मुक्त होऊ शकतो. या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष राजेश जैन, महिला अध्यक्ष सौ हर्षा संघवी, सेक्रेटरी मनोज जैन, सेक्रेटरी मित्तल शहा, यांचे सह व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रतनचंदजी संघवी, डॉ. ममता श्री श्री माळ, डॉ. सपना बोथरा, अजय भंडारी , रितेश ललवाणी, जैन समाजातील ज्येष्ठ नागरिक व्यापारी व जैन महिला मंडळ उपस्थित होते.