श्री.गो.से.हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Inauguration ceremony of 10th class students completed in Shri Go.S. High School

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा -पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व सदिच्छा समारंभ शालेय समिती चेअरमन मा. दादासो. . खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते जळगांव येथील महावीर क्लासेसचे संचालक मा.श्री.एन.जे.गादिया सर, शाळेचे माजी पर्यवेक्षक मा.श्री.एस.एस.चौधरी सर, तसेच तांत्रिक विभाग चेअरमन मा.आण्णासो.श्री. वासुदेव महाजन उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वतीचे प्रतिमा पूजन करून व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री. सागर थोरात सर व श्री.रुपेश पाटील सर यांनी ईशस्तवन सादर केले.
मुख्याध्यापक व इतर पदाधिकाऱ्यांचे हस्ते सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.आर. पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शाळा व संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री.एन.जे.गादिया सर यांनी विद्यार्थ्यांना दहावी नंतर उपलब्ध विविध शैक्षणिक वाटा, स्पर्धा परीक्षा या विषयी अनमोल मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी महावीर क्लासेस विशेष सुविधा देणार असल्याचे जाहीर केले.
श्री.एस.एस.चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजक रित्या मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगतात शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात मा. दादासो. श्री.खलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या शैलीत काव्य स्वरूपात मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी कौंडिण्य सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. ए. बी. अहिरे सर, सौ. ए. आर. गोहिल मॅडम, श्री. आर. बी. तडवी सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी व दहावीचे विद्यार्थी,पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार व नियोजन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले.

Related Articles

Back to top button