लायन्स क्लब कराड सिटी चा पदग्रहण सोहोळा 14 जुलै रोजी हॉटेल महेंद्र येथे पार पडला .

लायन्स क्लब कराड सिटी चा पदग्रहण सोहोळा 14 जुलै रोजी हॉटेल महेंद्र येथे पार पडला . लायन एमजेफ सौ मंजिरी खुस्पे यांना व त्यांच्या संचालक मंडळाला पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित यांनी शपथ दिली . प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लायन वीरेंद्र चिखले यांनी नवीन पाच सदस्यांना सदस्त्वाची शपथ दिली . लायन्स क्लब कराड सिटी च्या पदग्रहण सोहोळ्याचे पौरोहित्य पीएमजेएफ व माजी प्रांतपाल तसेच मल्टिपल जीएमटी जगदीश पुरोहित यांनी केले . अत्यंत दिमाखदार सोहोळ्यात आगळया वेगळ्या पद्धतीने लायन पुरोहित यांनी हि जबाबदारी पार पाडली . विविध रंगी दुपट्यांच्या आकर्षक थीम ने त्यांनी हा सोहोळा सजवला व सर्व संचालक मंडळाला त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या व अत्यंत मानाचा असलेला गोव्हन प्रांतपाल एमजेफ लायन एम के पाटील तसेच प्रथम उप प्रांतपाल ला वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते नवं निर्वाचित अध्यक्ष एमजेएफ ला मंजिरी खुस्पे यांना प्रदान केला . यावेळेस लायन्स क्लब कराड सिटी च्या इन्फोग्राम चे प्रकाशन करण्यात आले . कराड व मलकापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा . दादा सो शिंगण यांचा यावेळी सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला . तसेच विविध परीक्षांमध्ये यश मिळवल्या बद्दल विद्यार्थाना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले . ला . सुनीता कदम व ला उमा जानुगडे यांनी लायन्स चे चिन्ह देऊन उपस्थितांचे स्वागत केले . मावळते अध्यक्ष ला संदीप कोलते यांनी या वेळी बोलताना मागील वर्षी केलेल्या सेवा कार्याचा आढावा घेतला तसेच मावळत्या सेक्रेटरी एमजेएफ ला मंजीरी खुस्पे यांनी क्लबला मिळालेल्या 15 अवॉर्ड ची माहिती यावेळेस दिली . झोन चेअरमन ला रमेश जाधव तसेच रिजन चेअरमन ला दिलीप वहाळकर यांनी शुभेच्छा देऊन क्लब ला सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन करण्याची हमी दिली . रिजन सेक्रेटरी एमजेएफ ला बाळकृष्ण जाधव यांचा हि या वेळी सन्मान करण्यात आला . प्रांतपाल एमजेएफ ला एम के पाटील यांनी क्लब ला सुंदर असे मार्गदर्शन केले .
नवनिर्वाचित अध्यक्षा एमजेएफ ला मंजिरी खुस्पे यांनी या वेळी बोलताना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांना आभिवादन करून त्यांच्या मुळेच मी इथे उभी आहे असे नमूद केले . अध्यक्ष म्हणून काम करताना लायन्स इंटरनॅशनल ने दिलेल्या आठ ग्लोबल कॉज वर काम करणार असल्याचे सांगितले . तसेच रिजन मधील प्रत्येक क्लब बरोबर एक तरी ज्योईंट एक्टिविटी करण्याचा मानस बोलून दाखवला व त्याला रिजन दोन मधून आलेल्या सर्व क्लब च्या प्रतिनिधींनी जोरदार प्रतिसाद दिला . ला मेघना पाटील , ला सोफिया कागदी , लायन कांचन सोळवंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली . एमजेएफ ला नईम कागदी व मैथिली खुस्पे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले . ला सुनीता पाटील यांनी आभार मानले . यावेळी रिजन मधील विविध क्लब चे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते . एमजेएफ ला . राजेंद्र मोहिते , ला सौ ज्योती मोहिते , शिवाजीराव फडतरे , एमजेफ ला बाळासाहेब शिरकांडे , ला . रोकडे , ला महेंद्र कदम , ला चव्हाण , ला प्रवीण भोसले , ला . जाधव , ला संदीप पवार , ला स्मिता हुलवान , कॅबिनेट ला गौरी चव्हाण , कॅबिनेट लायन विद्या मोरे , ला. राजश्री पालकर ला अनघा राजगुरू , ला खोब्रागडे , ला . जयश्री साने , कॅबिनेट ला. ईला जोगी , ला.ज्योती शहा , ला.जान्हवी पुरोहित ला राजश्री पालकर , ला . प्रीती ओसवाल , ला.डॉ देवकर , ला. जयश्री साने तसेच लायन्स क्लब सोलापूर चे गंगाप्रसाद , ला रामुगडे , ला डॉ लोखंडे , ला पाटील , ला सतीश पाटील , ला संदीप तलाठी , ला प्रवीण राव , ला . वैराग्य जांभळे , ला . भिसे , ला सुप्रीम तावरे , ला . लायन्स क्लब अजिंक्य चे अनेक सदस्य , लायन्स नक्षत्र चे अनेक सदस्य , लायन काळ कराड एमआयडीसी व सातारा एमआयडीसी ,लायन क्लब मसूर चे अनेक सदस्य उपस्थित होते . कराड व परिसरातील अनेक नामवंत नागरिक व पालक यावेळी उपस्थित होते . राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली .

Related Articles

Back to top button