छत्रपति शिवजयंती शांततेत साजरी करा

Chhatrapati Shivjanti Shanteet get decorated

शांतता समितीच्या बैठकीत
पोलिस प्रशासनाचे आवाहन !

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – १९ फेब्रुवारी रोजी तारखे नुसार साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, ठाणे अंमलदार संदिप भोई, गोपनीय विभागाचे दिपक पाटील, भोजराज धनगर यांचेसह शांतता समितीचे सईद पंजाबी, वहाब बागवान, रविंद्र पाटील, विजय जाधव, कुणाल मोरे, खंडु सोनवणे, सईद शेख,अक्रम कुरेशी, जहांगिर पिंजारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी उपस्थितांना सुचना देतांना सांगितले की, १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही शांततेत साजरी करा, आक्षेपार्ह संगित, गाणे वाजवु नये, मद्यप्राशन करु नये, कुठलेही आक्षेपार्ह पोस्टर अथवा देखावे सादर करु नये, मा. न्यायालयाने निर्देशित केलेल्या वेळत मिरवणूकीची सांगता करावी, समाज बांधवांत कुठलाही तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करु नये अशा सूचना देण्यात आल्या . मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, मिरवणुकीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून नगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर पथदिवे लावण्यात येणार आहेत यासोबतच अडचणीच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार असल्याचे मंगेश देवरे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button