खिचपुरी महोत्सवाचा मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला आनंद

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भडगाव तालुक्यातील कनाशी येथे दर सात वर्षांनी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. या महोत्सवात शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन महोत्सवाचा आनंद लुटला. या महोत्सवात आयोजकांच्या वतीने मा. वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले. महोत्सवात गीता पाठ, शोभायात्रा, भजन पूजन कार्यक्रमाचा आनंद घेत या मंगलमय वातावरणात त्या तल्लीन झाल्या. यावेळी भाविकांची मांदियाळी खिचपुरी महोत्सवाची शोभा वाढवत होती.

Related Articles

Back to top button