आ.किशोर आप्पा पाटील यांना मातृषोक,गं.भा. नर्मदाबाई पाटील अनंतात विलीन!
आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा प्रतिनिधी )- पाचोरा – भडगांव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री गं.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि.२४ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ४:५५ वाजे सुमारास निधन झाले. गं.भा. नर्मदा आजींच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्या पांडुरंगाच्या असीम भक्त आणि वारकरी होत्या.
*अंत्य संस्काराला अलोट गर्दी*
गं.भा. नर्मदाबाई आजींच्या अंत्यसंस्कार पाचोरा येथील वैकुंठधामात दुपारी ४:३० वाजे सुमारास शोकाकुल वातावरणात पार पडला. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध राजकीय, सामाजिक, संघटना, मंडळे यांच्या वतीने चौकाचौकात श्रद्धांजली फलक लावण्यात आले होते. अंत्य यात्रेच्या वाटेत रांगोळ्या टाकून त्यांना अखेरचा निरोप देतांना माल्यार्पण करण्यात आले. अंत्यसंस्काराला महायुतीतील घटक पक्षाचे शिवसेना ,भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, उबाठा शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस,आरपीआय आठवले,कवाडे गट, जळगांव जिल्ह्यातील व पाचोरा -भडगांव मतदार संघाचे सर्व पक्षांचे, विरोधी पक्षांचे नेत्यांनी शोकसंदेश पाठविले होते. तर अंत्यविधीला जिल्हा व तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, संस्था, उद्योजक ,व्यावसायिक, डॉक्टर्स , वकील संघटना, महसूल, पोलिस, सर्व विभागातील प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, बिल्डर्स, गणपती, देवी मंडळे, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नातेवाईक,आप्तेष्ट, मित्र परिवार, मुळगाव अंतुरली व दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ, वारकरी तसेच सर्व समाजातील नागरिक, प्रिंट व सोशल मीडिया सह विविध वृत्त पत्रांचे संपादक, पत्रकार संघटनांचे पत्रकार अंत्य संस्काराला मोठ्या संख्येने उपस्थित होते.