सोयगाव स.पो.नि. पंकज बारवाल यांचा उर्मटपणा,भाजपा कार्यकर्त्यांचा ठिय्या
आप्पा वाघ
(संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी)
सोयगाव – कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून संबोधले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असतांना सोयगाव येथील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांवर सोयगाव पोलीस ठाण्यात दि.२५ मंगळवारी रोजी एका सहा . पोलिस निरीक्षकाच्या उर्मट वागणूक विरोधात पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील एका मुस्लिम युवकाने दि.२५ मंगळवारी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी पोस्ट व्हायरल केली. याप्रकरणी कारवाई करावी यासाठी आदर्श जरंडी ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा भाजपचे सरचिटणीस संजय पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाणे गाठले. भाजपा पदाधिकारी पाटील यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी उद्धट वागणूक देत पोलीस ठाण्यातून हाकलून लावल्याने ठाण्यात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून संबोधले जाणारे महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असतांना देखील पोलीस प्रशासनाकडून भाजपच्या पदाधिकारी यांना उद्धट व अपमानास्पद वागणूक मिळत आहे. भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे हे चर्चा करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक आरेकर यांनी आम्ही का इथं उपटायला आहे का.? अशी अभद्र भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवाराच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. दरम्यान हिंदुत्व व निवडणुकीत तनमनाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जिल्हास्तरावील नेते भाजपचे मंत्री वेळोवेळी सहकार्य करीत नसल्याने युवकांमधून भाजप विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्धट वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते.