Akola news:गरसोळी येथे रस्त्याचे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भूमिपूजनजोड रस्ता कुटासा,दहिहांडा 20 लक्ष रुपये मंजूर जिल्हा अध्यक्षांची वचनपूर्ती..

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

अकोट तालुक्यातील अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातील ग्राम गरसोळी येथिल दोन किलोमीटर जोड रस्त्यासाठी 20 लक्ष रुपये मंजूर करुन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भूमिपूजन करण्यात आले.गरसोळी येथे अनेक वर्षापासून रस्त्याचे काम प्रलंबित असुन जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत होती. हे पाहता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन सर्व गरसोळी ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश तरोळे कोळी महासंघ अकोला जिल्हा अध्यक्ष, व कार्यक्रमाचे उद्घाटक वंचित बहुजन आघाडी चे
जिल्हा अध्यक्ष, प्रमोद देंडवे जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट,जिल्हा परिषद सदस्या स्फूर्तीताई गावंडे, पंचायत समिती सदस्या सपनाताई झासकर, पंचायत समिती गट नेते धिरज सिरसाठ, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे संघटक सुरेंद्र ओईंबे प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे निखिल गावंडे गट ग्राम पंचायत पातोंडा गरसोळी चे सरपंच गजानन सोळंके ,संजय बुध, युवराज गावंडे, सुबोध वानखडे यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यानंतर शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, त्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला लीलाबाई श्रावण तरोळे, दिनेश तरोळे, महादेवराव उमाळे, गुलाबराव तरोळे, सुरेश कोलटक्के, गणेराव तरोळे, गोपाल तरोळे, देविदास तरोळे, विकी खाडे,विठ्ठल तरोळे, पुर्णाजी अनकुरकार ,पंजाबराव तरोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष व कोळी महासंघ अकोला जिल्हा अध्यक्ष रमेश तरोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल तरोळे गुरजी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश तरोळे कुटासा येथिल नासिर यानी केले.तर आभार प्रदर्शन, दिनेश तरोळे यांनी केले.यावेळी
आदींनी उपस्थिती दर्शविली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button