Akola news:बाबू जगजीवनराम शिक्षण संकुलात शिक्षकदिन साजरा
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट –स्थानिक अकोट शहराच्या मध्यभागी असलेल्या बाबू जगजीवनराम शिक्षण संकुला मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे सर होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य देवेंद्र जपसरे सर ,उपासे मॅडम हे होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रमुख उपस्थितांचे व अध्यक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्वेता हिवराळे तर आभार प्रदर्शन कु.दीक्षा पंचांग हिने केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले