महाराष्ट्र धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची भेट
(संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी)- सोयगाव- तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांची मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी काल शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश ऊप अध्यक्ष पुष्कर जी महाराज गोसावी पैठण जिल्हाप्रमुख ह भ प कडूबाळ महाराज गव्हादे यांनी सदिच्छा भेट घेतली तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध समस्या त्यांनी मांडल्या जिल्हाभरात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच धर्म रक्षणार्थ काम करणाऱ्यांच्या आम्ही सदैव पाठीशी राहू असे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी म.रा.प्रदेश ऊप अध्यक्ष पुष्कर महाराज गोसावी व जिल्हाप्रमुख कडुबाळ महाराज गव्हादे यांना आश्वासन दिले.