नगरदेवळा येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीमिशन अभियानाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न,मार्गदर्शन अभियानात ५०० शेतकऱ्यांचा सहभाग

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) पाचोरा – दि. ४ मार्च रोजी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी समुहांचे प्रशिक्षण प्रगतील शेतकरी नाना विश्राम महाजन यांच्य विश्रामबागेत संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणासाठी उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे, तालुका कृषि अधिकारी पाचोरा रमेश जाधव, सर्ग विकास समीतीचे नितीन वारके, पी.एम.एफ.एम.ई. योजनेचे डि.आर.पी. समाधान पाटील तसेच शाश्वत शेतीचे प्रणेते मनोज पाटील मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी सचिन महाजन, संजय महाजन, ईंद्रनिल भामरे यांच्या सह परीसरातील शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रमास उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना समाधान पाटील यांनी पंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योयन योजनेतुन उभारण्यात येणाऱ्या उद्योगांची सखोल माहीती दिली. सर्ग विकास समितीचे नितीन वारके यांनी नैसर्गिक शेती अभीयानांतर्गत सी.पी.पी. कल्चर उभारण्याचे प्रत्यक्ष मॉडेल कसे करावे व नैसर्गिक शेती प्रमाणीकरण कसे करावे या बाबत तसेच शाश्वत शेतीचे प्रणेते मनोज पाटील यांनी नैसर्गिक शेतीचे शाश्वत स्वरुप विषद केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी शुन्य मशागत, तसेच एकाच क्षेत्रावर विविध शेती पध्दतीचे मॉडेल कश्याप्रकारे साकारुन जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी कसे घ्यावे या बाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरात ५०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नाना महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषि अधिकारी एस.पी. बोरसे, कृषि पर्यवेक्षक रामेश्वर पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव व कृषि विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button