महिलादिना निमित्त अ.भा. ग्राहक पंचायत तर्फे स्त्री शक्तीचा सन्मान

Women's Day Honoring Stree Shakti by Customer Panchayat

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि) – महिला शक्ति हेच मानवी सुसंस्कारित पिढी घडविणारे खरे विद्यापीठ असल्याचे मत डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अ.भा. ग्राहक पंचायत यांनी महिलादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित कर्तुत्वान महिला शक्तीचा सन्मान सोहळा पाचोरा येथे जिल्हामहिला प्रांतप्रतिनिधी सौ.निर्मला देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला .यावेळी तालुका अध्यक्ष संजय रतन पाटील ,तालुका संघटक ॲड. निलेश सूर्यवंशी , तालुका सचिव सुधाकर पाटील, तालुका कृषी व महसूल समितीप्रमुख सौ.अरुण उदावांद, तालुका आरोग्य समिती प्रमुख डॉ.दिनेश सोनार, जिल्हा वैद्यकीय समितीप्रमुख डॉ.मुकेश नैनाव, तालुका न्याय व विधी समितीप्रमुख ॲड.स्वप्नील पाटील, डॉ. अमित देशमुख, श्री. देसले ,श्री .सोमवंशी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सौ.निर्मला देशमुख यांचे हस्ते आदर्श शिक्षिका सौ. अरुणा उदावांद डॉ.प्रतिभा तेली ,डॉ.जयश्री सोनार, डॉ.अमृता झवर , डॉ.अनघा देशमुख डिंबले पुणे ,सर्वोत्कृष्ट कुतुंबिनी सौ.प्रतिभा पाटील, सौ.अनिता सूर्यवंशी, सौ.अनिता पाटील, फूड हैजिन एक्स्पर्ट सौ.निता देशमुख पुणे आदी कर्तुत्वान महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मनोगतात डॉ.सौ.अमृता झवर ,डॉ.जयश्री सोनार, व सौ.अरुण उदावांद यांनी स्त्री शक्तीचा सन्मान व आदर समाजाने एक दिवसीय न करता कायम आदर करावा अशी रास्त भावना व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी महिला शक्ति हीच सुसंस्कारित मानवी पिढी निर्माण करणारे खरे शक्तीपीठ असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार ॲड. निलेश सूर्यवंशी यांनी मानले.

Related Articles

Back to top button