पुणे/बातमी:प्रियदर्शनी विद्या मंदिर ‘पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा करंडका’ चे मानकरी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे आयोजन

पत्रकार : स्वामी दळवी
पुणे : आदर्श खेळाडू व आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि ६ व्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यामध्ये पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रियदर्शनी विद्या मंदिर आणि ६ व्या जाधवर क्रीडा महोत्सवात जाधवर इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवित फिरता करंडक पटकाविला आहे.न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, न-हे गावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे, सागर भूमकर, शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भुपेंद्र मोरे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपटू स्नेहल शिंदे-साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमढेरे यांना देखील प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होते.जाधवर इन्स्टिट्यूटमधील सूरज हत्तींबिरे, रेणुका पांडे, सिद्धीविनायक सावंत, स्वनिल चिंचोलकर, ज्ञानराज जगताप, विहान सकपाळ, अर्णव सोलनकर, प्रद्युम्न, मुरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिक पटकाविले. तसेच संस्थेतील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे, अशांचा विशेष सन्मान विभागप्रमुखांच्या हस्ते करण्यात आला.विजय कुंभार म्हणाले, सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा झाली आहे. क्रीडा क्षेत्रात मुलांना घालणे, म्हणजे अभ्यासात नुकसान करुन घेणे, हा समज आहे. मात्र, या सगळ्याच्या पलिकडे बघितले तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये केवळ शिक्षण नाही, तर क्रीडा व विविध गोष्टी आपल्याला येणे गरजेचे आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये खेळांचा मोठा वाटा आहे.अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, भारतात रहात असताना क्रीडा प्रकारांना मोठया प्रमाणात महत्व होते. आज शिक्षणातून क्रीडा प्रकार काहीसे बाजूला जाताना दिसत आहेत. बाहेरच्या देशात क्रीडा प्रकारांना व क्रीडापटूंना आणि शिक्षकांना महत्व आहे. खेळामधून सकारात्मकता शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच खेळांचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे. याकरिता अंतर्गत स्पर्धांसोबतच आंतरशालेय स्पर्धांचे देखील यंदा आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button