माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्था पाचोरा तर्फे महिलांचा सत्कार
Mauli Multi-Purpose Senior Citizens' Organization Pachora felicitates women

आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा प्रतिनिधि )-
दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पाचोरा येथे माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संस्था पाचोरा तर्फे महिलांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नऊ महिलांचा सत्कार झाला. त्यात लताताई राजाराम सोनार, सौ. प्रिया मंगेश देवरे, सौ. उज्वला अशोक पवार, ॲड .भाग्यश्री कैलास महाजन, डॉ. सौ.अनुजा देशमुख, शितल परदेशी, प्रा. सौ.मोहिनी चित्ते, कविता मासरे आदीं महिलांचा पुरस्कार म्हणून शाल, पुष्प, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच इतर सर्व उपस्थित महिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना व महिलांना मार्गदर्शन केले. व महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात मागण्यांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.अध्यक्ष राजाराम नागो सोनार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सी.एन. चौधरी यांनी तर आभार के.एस महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश बळीराम महाजन, नाना फकीरा महाजन शांताराम चौधरी यांनी परिश्रम घेतले.


