जगतगुरु पदवी बहाल करण्यात आलेल्या शांतीगिरी महाराजांचे पाचोऱ्यात भव्य स्वागत,शहरातील एमएम महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्कार सोहळा संपन्न
Shantigiri Maharaj, who was restored with the title of Jagatguru, was given a grand welcome in Pachoriya.
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा -जगद्गुरु जनार्दन स्वामी यांनी अनेक ठिकाणी बहुजनांच्या मुलांसाठी गोरगरिबांच्या सेवेसाठी आश्रम शाळा कॉलेज अन्नदान सेवा काढून शिक्षणाचे महत्त्व काय असते शिक्षण झाल्यानंतरच प्रत्येक विद्यार्थी हा हुशार होत असतो जगद्गुरु जनार्दन स्वामी वेरूळ आश्रम यांच्या आशीर्वादाने परमपूज्य महामंडलेश्वर जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांना नुकतीच जगतगुरु हि पदवी असल्याने पाचोरा येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या भडगावरोड वरील एम एम महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात दि.१४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या सन्मानार्थ सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांतीगिरी महाराजांचे पाचोरा नगरीत दुपारी कृष्णापुरी येथे आगमन झाले. त्यानंतर तेथील सप्तशृंगी मातामंदिरात पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे राजे संभाजी चौकातील छत्रपती संभाजीराजे स्मारकास मल्यारपण करून एमएम महाविद्यालयात जगतगुरूंचे भव्य स्वागत पूजन सोहळा सुरू झाला. शांतीगिरी महाराजांना जगद्गुरु ही पदवी प्रयागराज येथील पंच आखाडा जुना आखाड्याचे संत अवधेशानंद- गिरीजी महाराज, l पीठ हरेश्वर आचार्य यांच्या हस्ते जगद्गुरु हि पदवी बहाल करण्यात आली आहे. प्रवचनात शांतिगिरी महाराज यांनी भक्तांना श्रमदानाचे महत्त्व काय असते याचे मार्गदर्शन आणि उपदेश केले. कार्यक्रमास जळगांव जिल्हा सह पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.