Akola news:मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आकोटात कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी केले बंदला पूर्ण सहकार्य.
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूटपणे अमानुष लाठी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी पुकारलेल्या आकोट बंदला व्यापारी बांधवांनीही पूर्ण सहकार्य केल्याने आकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.या दरम्यान आकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांतर्फे काही वेळ धरणे देऊन निदर्शने करण्यात आली. वर्तमान शासन व पोलीस प्रशासनाच्या अमानुष कृत्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून निषेध पदयात्रा काढली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अंतरवाली येथील मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर माजी आमदार संजय गावंडे, कृउबास सभापती प्रशांत पाचडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलीप बोचे, प्रदीप वानखडे, मनोज खंडारे, प्रमोद चोरे,अनंत गावंडे, कैलास गोंडचर,वंचित आघाडी तालुका अध्यक्ष चरण इंगळे, वंचित आघाडी युवा दीपक बोडखे, अरुण जवंजाळ, राजेंद्र पुंडकर, रोशन पुंडकर,कुलदीप वसु, सुशिल फुंडकर, अनंत सपकाळ, संजय पुंडकर, चंद्रशेखर बारब्दे, शिरीष पोटे, अविनाश डिक्कर, प्रवीण डिक्कर ,मनीष कराळे, सुगत वानखडे, अक्षय तेलगोटे, शाम गावंडे, सतीश हांडे, मंदाताई कोल्हे, माया म्हैसने, विलास साबळे, अतुल म्हैसने, प्रदीप कुलट, बंडू बोरोकार, अनिकेत कुलट, सुभाष तेलगोटे, सय्यद शरीफ राणा, विशाल आग्रे, मुकेश निचळ,राहुल कुलट यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.