श्रीराम मदिर येथे बाल संस्कार शिबीर
Children's Sanskar Shibir at Shri Ram Mandir
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आकोट:- स्थानिक श्रीराम मंदिर मोठे बारगण येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत रूपलाल महाराज बाल विकास शिबीर दि . ०२/०५/२०२४ ला सुरुवात झाली आहे .
सविस्तर असे कि श्री . संत रूपलाल महाराजांच्या कृपेने उन्हाळ्याची सुट्टी कोठे घालवली तर
याना संस्कार घडवण्या करिता शिबीरां मध्ये श्लोक , अभग चाली वर आणि स्वरात व त्याच्या कडून गायन करून घेणे , बौद्धिक अध्यात्मीक ज्ञानाचा पाठ शिकविणे, योगा शिकविणे तसेच सायंकाळी पावल्या व हरीपाठ इत्यादी शिकविल्या जाते .
अक्षय तृतीया चे मुहुर्त पाहुन आज येथे अखिल भारतीय मराठी
साहित्य परिषद आकोट अंतर्गत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली तसेच शिक्षण महर्षी कर्मविर भाऊराव पाटील , भगवान परशुराम यांची जयंती व थोर संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री राजकुमार
भगत , ता . अध्यक्ष विजय जितकर मंदिराचे सदस्य श्री रामदास भाऊ बेराड , श्रीकृष्ण महाराज मुळे आणि मुलांना घडविण्या करिता दररोज योगदान देत असलेले हभप अरबे महाराज, हभप रामकृष्ण महाराज दातीर , हभप यमुना ताई दातीर, हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे इत्या दांची सेवा घडते . दररोज वेगवेगळे भक्त गण नाश्ता मुलांना देत असतात .