भडगाव मध्ये चोरटयांचे धडक सराफ दुकानाची भिंत फोडून ६ किलो चांदी व रोकड चोरी अज्ञात चोरटयां विरुद्ध गुन्हा दाखल
आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी ) भडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंत फोडून तब्बल सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली दोन दिवसां पासून बंद असलेल्या दुकानावर चोरट्यांनी डोळा ठेवत ही धाडसी चोरी केल्याने भडगाव शहरात खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवार १८ मार्च २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे .मिळालेल्या माहिती नुसार घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेले होते त्यामुळे दुकान दोन दिवसां पासून बंद होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी १७ मार्च रोजी मध्यरात्री दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला त्यांनी दुकानातील ६ किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले. मंगळवारी १८ मार्च रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना भिंत फोडलेली दिसली आणि चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने मालकाला आणि पोलिसांना माहिती दिली.ही चोरी शहराच्या मुख्य रस्त्यावर घडली असून पोलिसांच्या गस्तीला आव्हान देणारी ठरली आहेनागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांचा धाकच उरला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगाव परिसरात गिरणा नदी पात्रातील वाळू उपसा आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांची निष्क्रियता चर्चेचा विषय ठरली आहे भडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केलाचोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासले जात आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मात्र या धाडसी चोरीमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पुन्हा एकदा प्रश्नचिन्हांकित झाली आहे.