कुंपनच शेत खात आहे! रक्षकच भक्षक बनल्यावर आणखी काय होणार

कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता किरण कुमार अन्नमवार यांच्या हजेरीत प्रभाग -१७१ -१७० आणि १६८ हद्दीत अनधिकृत बांधकामांचा भडिमार!अनधिकृत बांधकामे रोखण्याऐवजी त्यांना साथ देणाऱ्या पालिका सहा. अभियंता किरण कुमार अन्नमवार अधिकाऱ्यांना दलाल म्हणावे का?

मुम्बई/अजय उपाध्याय
कुर्ला एल विभाग भ्रष्टाचार प्रसिद्ध विभाग म्हणून आपली ओळख निर्माण करणारा १७१ – १७०आणि १६८ प्रभाग हा अनधिकृत बांधकामांचा किल्ला आहे. कुर्ला एल विभाग महानगरपालिकेत शहरातील १६ प्रभागां पैकी १७१ ,१७० आणि १६८ प्रभागाची ख्याती वेगळी आहे. १७१ ,१७० आणि १६८ हद्दीत नियुक्त होणारा प्रत्येक अधिकारी भ्रष्टाचारात विलीन होतो.तसेच या प्रभागात बांधकाम व्यावसायिक गुंडांची भूमाफिया टोळी सक्रिय आहे.त्यामुळे पैसे आणि मोठं मोठ्या मंत्री संत्री यांच्या नांवाने पालिका अधिकाऱ्यांवर भार येणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे पालिका प्रशासन आपला खिसा भरण्याकडे केंद्रित आहे.त्यामुळे आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सम्पूर्ण प्रभाग १७१ ,१७० आणि १६८ हद्दीत भोंगळ कारभार चालू आहे.असे सद्यस्थिती बघता लक्षात येते.धनाजी हेर्लेकर यांची नियुक्ती सहआयुक्त पदी झाल्या नंतर प्रभाग १७१ ,१७० आणि १६८ मध्ये कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता म्हणून किरण कुमार अन्नमवार यांची नियुक्ती होती .त्यांनी आपल्या पदाचा वापर करून अनधिकृत बांधकामांवर रोख लावतील अशी अपेक्षा होती. परंतु याविपरित त्यांनी बांधकाम व्यावसायिक आणि भूमाफियाना पाठीशी घालण्याचे काम केले.प्रभागात नव्याने चालू असलेल्या बांधकामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे.सध्या.कुरेश नगर महाराष्ट्र काँटा, शिवाजी कुटीर मण्डल,तक्यावार्ड,रूपा कम्पाउंड या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जोमाने चालू आहेत.आणि करण्यात आले आहे त्याचबरोबर नवंनियुक्त कनिष्ठ अभियंता मंगेश पाटिल प्रभाग हद्दीत सैरावैरा फिरतांना दिसत आहेत.त्यामुळे कारवाई होईल की भ्रष्टाचार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button