पाचोरा पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी कार्यक्रम संपन्न*. सर्व धर्मियांनी शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त दि.२२ शनिवार रोजी डी. वाय. एस.पी.धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेत इफ्तार पार्टी व शांतता समितीची बैठक कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पोलिस निरीक्षक अशोक पवार, सहा .पोलिस निरीक्षक योगेश गणगे , श्री. चव्हाणके, श्री.दळवी, श्री.गोरे, श्री अशोक पाटील, हिंदू – मुस्लिम सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मशिदींचे मुल्ला मौलवी, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे रमजान ईद निमित्त पाचोरा शहरातील पोलिसांनी रूट मार्च काढून शहरात शांतता राहावी यासाठी शांततेचे आवाहन केले आहे . हिंदू व मुस्लिम बांधवांनी जातीय सलोख्याने आपापले सण ,उत्सव साजरे करावे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रयत्न करावे, आपले शहर आपले गाव व आपलेच सर्व असून एकमेकाला सहकार्य केले पाहिजे. ईदच्या पार्श्वभूमीवर रमजाननिमित्त हिंदू मुस्लिम समाजाची पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित हिंदू मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला काही सूचना केल्या. बैठकीला पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी देखील मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित बांधवांना रोजाचा उपास सोडण्यासाठी फळ फ्रूट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी यांनी तर आभार पी एस आय योगेश गणगे यांनी मानले.

Related Articles

Back to top button