बांबरुड राणिचे येथे पशुधनावर बिबट्याचा हल्ला
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
बांबरुड राणिचे येथील शेतकर्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला केला.
पाचोरा प्रतिनिधी )- बांबरुड राणिचे येथील शेतातील गोऱ्हावर बिबट्याने हल्ला केल्याने गोऱ्हा मरण पावला. तालुक्यातील बांबरूड राणिचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांच्या खड़की शिवारातील तेली बडल्ली जवळील गट नंबर ५१ मध्ये २ बैल,३ गाई, ५ वासरे व ३ गोऱ्हा शेतात होते. त्यामधील ३ वर्षाचा गोऱ्हा बिबट्याने दि.१९ मार्च रोजी रात्री ८.३० सुमारास हल्ला केला. वनविभाग अधिकारी यांना घटनेची माहीती दिली असता कर्मचारी यांनी येऊन पचंनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी पी.एम रिपोर्ट दिलाआहे. पशुधनाची हानी झाली असुन शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.