नागरिकांसाठी विविध शासकीय योजनेचे मार्गदर्शन शिबिर* आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनात उपक्रम
Various government scheme guidance camp for citizens* Initiative under the guidance of MLA Kishore Appa Patil!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) –
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभांची माहिती मिळत नसल्याने लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा भडगाव मतदार संघ विविध योजनांची माहिती देण्या करिता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयामध्ये माहिती शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तहसील कचेरीत पुरवठा विभागात रेशन कार्ड साठी लागणारी कागदपत्र, पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती मदत , बाल संगोपन श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, नवीन मतदान कार्ड व दुरुस्ती करणे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजनांची माहिती व मदत करण्यात येणार आहे. तरी शासकीय योजना संदर्भात लाभार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा. शिबिराला प्रभाग क्रमांक आठ मधून सुरुवात करण्यात आली असून शिवसेनेचे पदाधिकारी बंडू सोनार, प्रताप हटकर,
शुभम बागुल, राजेश जमदाडे, संदीप पाटील, आशा सेविका वैशाली पाटील यांनी कामकाज पाहिले.