शिवकार्याला साथ देऊया ! शिवसेना पक्षाचे सदस्य होऊया आ. किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन!
Support Shivkarya! Become a member of Shiv Sena Party come on Appeal of Kishore Appa Patil!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भडगांव तालुका शिवसेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सदर बैठकीला मार्गदर्शन करतांना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरात शिवसेना सदस्यांची जास्तीत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच 7703077030 या नंबर वर मिस कॉल देऊन लिंक वर आपला सदस्य नोंदणी फॉर्म भरावा किंवा QR कोड स्कॅन करून आपला फॉर्म तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावे असे आवाहनही करण्यात आले. प्रसंगि शिवसेना जिल्हा यावेळी रावसाहेब पाटील , शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशी भाऊ येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख लखीचंद भाऊ पाटील , माजी नगरसेवक आनंद शेठ जैन माजी नगरसेवक संतोष महाजन, माजी नगरसेवक जगू दादा, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे ,शिवसेना समाधान पाटील, डॉ. प्रमोद पाटील, सुधाकर पाटील , स्वप्निल पाटील ,भाऊसाहेब पाटील, जगदीश पाटील, ,महेंद्र ततार, महिला आघाडी तालुका प्रमुख रत्ना ताई, सीमाताई महाजन, मेनका ताई महाजन तसेच मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.