दि.३० मार्च रोजी श्री जगन्नाथ मंदिर द्वितीय वर्धापनदिन सोहळा, वरखेडी रोड वरील इस्कॉनमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

On March 30th, Sri Jagannath Temple's second anniversary celebration, various religious programs were organized at ISKCON Temple on Varkhedi Road!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संचालित भगवान श्री जगन्नाथ मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा रविवार, ३० मार्च २०२५ रोजी इस्कॉन मंदिर,वरखेडी रोड पाचोरा येथे संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडणार आहे.भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दिव्य दर्शनाचा लाभ भाविकांना या पावन सोहळ्यात घेता येणार आहे. पाचोरा येथील इस्कॉन तर्फे मंदिराच्या स्थापनेपासून सतत धर्मप्रसार, नामसंकीर्तन, गोरक्षण, बालसंस्कार केंद्र, गीता ज्ञान प्रसार आणि समाजप्रबोधन असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. वर्धापनदिनाच्या निमित्ताने मंदिर व्यवस्थापनाने भक्तगणांसाठी विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
*कार्यक्रमाचे स्वरूप*
संध्या. ६:०० – श्री विग्रह अभिषेक व पूजन
संध्या. ७:०० – श्रीमद्भगवद्गीता प्रवचन
संध्या. ८:०० – भजन व कीर्तन
संध्या. ८:३० – महाप्रसाद वितरण
*विशेष आकर्षण* भाविकांसाठी विशेष सजावट, फुलांच्या रांगोळ्या आणि दीपोत्सव,
संतांचे कीर्तन व प्रवचन भगवद्भक्त संतांचा सन्माननीय सहभाग,
महा-अभिषेक व संकीर्तन भाविकांना प्रत्यक्ष पूजनाचा व कीर्तनाचा लाभ, सर्व भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन
*मंदिराचे कार्य आणि सामाजिक उपक्रम*
श्री जगन्नाथ मंदिर (इस्कॉन) केवळ एक धार्मिक स्थळ नसून, समाजहिताचे विविध उपक्रम येथे राबवले जातात.,विद्यार्थ्यांसाठी गीता ज्ञान प्रसार , बालसंस्कार केंद्र,
गोरक्षण व गाईंचे संगोपन,
गरीब व गरजूंसाठी अन्नदान आणि सेवा प्रकल्प,
संकीर्तन आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन पाचोरा मंदिर व्यवस्थापन तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button