माजी आ. आर.ओ.तात्या पाटील यांना विनम्र अभिवादन
Come on Regards to RO Tatya Patil
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा प्रतिनिधी – निर्मल सिड्स प्रा. लि. चे संस्थापक, माजी आमदार आणि कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व स्व. तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित “संगीतमय पुष्पांजली” कार्यक्रम निर्मल सीडस येथे पार पडला.
तात्यासाहेबांनी केवळ राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले.१९८८ मध्ये त्यांनी निर्मल सिड्सची स्थापना करून भारतीय शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पादनक्षम आणि ताणसहिष्णु वाण विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे निर्मल सिड्स आज भारतभर २३ राज्यांमध्ये आपला ठसा उमटवणारी एक अग्रगण्य कृषी संस्था बनली आहे.
तात्यासाहेबांचे योगदान आणि स्मरण
कार्यक्रमात मान्यवरांनी तात्यासाहेबांच्या समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “तात्यासाहेबांनी केवळ आमदार म्हणून नव्हे, तर एक समाजसेवक म्हणून शेती आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांचे कार्य पुढे नेणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे विचार शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
यावेळी संगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेषतः पारंपरिक भजन, अभंग, तसेच तात्यासाहेबांच्या आवडीच्या गाण्यांनी वातावरण भावनिक झाले.
कार्यक्रमास श्रीमती कमलताई पाटील,उबाठा शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, निर्मल सिड्स व्यवस्थापक डॉ. सुरेश एस. पाटील, डी. आर. देशमुख, डॉ. जे. सी. राजपूत, एस. एस. पाटील, पी. ए. दळवी, आय.एस. हलकुंडे, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, गणेश देवरे, योजनाताई पाटील, उद्धव मराठे, रमेश बाफना, गुलाब पाटील, राजू काळे, जे. के. पाटील, सिकंदर तडवी, ॲड .अभय पाटील, ॲड. प्रविण पाटील, डॉ. गोरख महाजन, डॉ. भरत पाटील, सुधाकर वाघ, एकनाथ महाराज, गजू पाटील, बाळू तात्या, दिपक पाटील, गणेश परदेशी,
मनोहर चौधरी, चेतन राजपूत, शरद पाटील, दिपक राजपूत, शशिकांत येवले, पप्पू राजपूत, राजेंद्र मोरे, हिलाल मेंबर, अरुण तांबे, डी. डी.पाटील , पंढरी पाटीलआदि उपस्थित होते.