पाचोऱ्यात घुटका तस्करावर सहा. पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांची कार्यवाही,३० लाखांचा घुटका, वाहन जप्त! पोलिस प्रशासनाची कार्यवाही बातमी, फोटो देण्यास टाळाटाळ!

The smuggler suffered a chokehold. Police inspector Dinesh Bhadane's action, Rs 30 lakh worth choked, vehicle seized! Police administration action news, refrain from giving photos!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – दि.१ एप्रिलच्या पहाटे सुमारे साडे तीन चार वाजे दरम्यान पाचोरा येथून चाळीसगाव कडे प्रतिबंधित विमल घुटका एका वाहनात जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सहा.पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी वरखेडी नाक्या जवळ नाकाबंदी करून पथकासह पाळत ठेवली. शहराच्या जामनेर रोड वरील वरखेडी नाक्या जवळ एक संशयित वाहन भरधाव वेगाने जात असता समोर पोलिस पाहून वाहन चालकाने गाडी वळविण्याचा आली आणि पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता त्या वाहनात सुमारे ६८ गोण्यांमध्ये प्रतिबंधित विमल घुटका, पानमसाला, तंबाखू पदार्थ आढळून आले. पोलिस पथकाने चालकां सह सदरचे वाहन पोलिस ठाण्यात आणून मुद्देमाल विषय माहिती जाणून घेतली असता लाखोंच्या किमतीचा घुटका असल्याचे समोर आले. सदरचा प्रतिबंधित घुटका शहरातील सिंधी कॅम्प मधील एका विमल तस्कराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी वाहन चालक आणि घुटक्याचा मालक या दोघांवर गुन्हा दाखल झाला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आजपर्यंतच्या कार्यवाहीत पाचोरा पोलिसांची घुटका जप्तीची ही मोठी कार्यवाही असून घुटका पकडणारे कर्तव्यदक्ष सहा.पोलिस निरीक्षक श्री.भदाणे सह पथकाचे धाडशी कार्यवाहीचे कौतुक केले जात आहे.

सविस्तर वृत्त असे की,
पाचोरा पोलीस ठाण्याच्या सतर्क पथकाने दि. १ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजता, पाचोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने वरखेडी नाका येथे गस्त आणि नाकाबंदी सुरू केली होती. या दरम्यान, जामनेर रोडकडून वेगाने येणाऱ्या (MH-52-7034) वाहनाच्या चालकाने पोलीस पाहताच गाडी वळवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत वाहन थांबवले.
३०.५४ लाखांचा गुटखा आणि तंबाखू जप्त
तपासणी दरम्यान, वाहनात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडले. केलेल्या कार्यवाहीत दत्तू लालदास बैरागी (वय ३१, रा. सिंधी कॉलनी, चाळीसगाव), सनी टेकचंद पंजाबी ra. सिंधी कॉलोनी पाचोरा याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध IPC कलम १२३, २२३, २७४, १७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई सहा .पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोहेकॉ. संजय पाटील,पोहेका. राहुल शिपी,पोहेका. सचिन पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button