लंडन किड्स’ आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्रिस्कूलचे आमदार किशोर आप्पा यांच्या हस्ते उद्घाटन

London Kids' international concept preschool inaugurated by MLA Kishore Appa

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा शहरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची नवी वाट उघडणाऱ्या ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्लेग्रुप व प्रिस्कूलच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक ०३ एप्रिल रोजी संघवी कॉलनी, पाचोरा येथे मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासह पाचोऱ्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक, पालकवर्ग आणि लहान बालकांची मोठी उपस्थिती होती. लंडन किड्स हे युके कॉन्सेप्टवर आधारित
आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रिस्कूल असून त्यात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी अशा सर्व शैक्षणिक टप्प्यांचा समावेश आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या संस्थेमध्ये ऑडियो-व्हिडीओ शिक्षण पद्धती, योगा फिटनेस प्रोग्राम, संगीत व हस्तकला अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना स्मार्ट व शार्प बनविण्याचा उद्देश आहे.’London Kids म्हणजेच Smart Kids’ या ब्रीदवाक्याला साजेशी व्यवस्था या प्रिस्कूलमध्ये करण्यात आली आहे . संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीत, डॉक्टर ऑन कॉलसह मासिक वैद्यकीय तपासणी, जागतिक स्तरावरील अवॉर्डप्राप्त ब्रँड, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, हवेशीर आणि सुरक्षित जागा, अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. हा ब्रँड
२७ राज्यांमध्ये विस्तारलेला असून, एकूण १३७५ सेंटर कार्यरत आहेत. २०१९ साली ‘सिलिकॉन इंडिया’तर्फे ‘मोस्ट
प्रॉमिसिंग प्रिस्कूल’ आणि ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ असा प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कारही या संस्थेला मिळालेला आहे.कार्यक्रमात संचालक मंडळाचे जितेंद्र बंसिलाल जैन (चेअरमन), नितीन स्वतंत्र जैन (कोषाध्यक्ष), महावीर दिलीप श्रीश्रीमाळ, यश मनोज संघवी, डॉ. प्रितेश पन्नालाल संकलेचा, आदेश विजय संघवी, डॉ. रोहित सतीश बोथरा (सेक्रेटरी), इंजी. कल्पेश नेमीचंद धाडीवाल, इंजी. भुषण अनिल बांठीया, कमलेश केवलचंद सुराणा, रोशन दिलीप पारख, मयुर सुनिल बाफना, शाळेच्या प्रिंसिपल सौ. प्रियंका कुमावत उपस्थित होते.शिक्षकवृंद सौ. चांदनी चेतन ओझा, सौ. मेहेर अनिल नागरानी मॅडम आहे तसेच कु. भावना संजय चोरडिया ह्या योगा व मेडिटेशनसाठी शिक्षिका असणार आहे . उद्घाटनानंतर ४ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत Free Activity Camp घेण्यात येणार असून लहान मुलांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. London Kids ही संकल्पना पाचोऱ्यातील बालशिक्षण क्षेत्राला नवा आयाम देणारी ठरणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांचे व स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button