श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा* वरखेडी रोडवरील इस्कॉन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी!
Shri Jagannath ISKCON Mandirat Shri Ram Janmotsav Celebration* Religious program of ISKCON temple on Varkhedi road, Mandiali!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा (प्रतिनिधी)- श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर पाचोरा येथील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी आयोजित श्रीराम नवमी महामहोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याची सुरुवात संकीर्तनाने झाली त्यानंतर प्रसिद्ध प्रवचनकार धन्वंतरी प्रभुजी (मुक्ताईनगर) यांचे श्रीरामकथेवर प्रवचन झाले.प्रवचनात त्यांनी प्रभु श्रीरामांचे जीवन आदर्श म्हणून कसे आजही प्रेरणादायी आहे. राम हे केवळ राजा नव्हते तर आदर्श पुत्र, पती, भाऊ आणि राजा होते. रामराज्य ही संकल्पना केवळ राजकीय व्यवस्थाच नव्हे तर ती धर्म, नीती, सेवा आणि न्यायाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. वनवासाच्या प्रसंगातून त्यांनी श्रीरामांचा त्याग, शिस्त आणि धर्मपालन याचे उदाहरण दिले. तसेच श्रीराम व हनुमान यांच्यातील भक्तिभावाचे वर्णन करत त्यांनी निस्वार्थ सेवा, समर्पण आणि नामस्मरणाचा महिमा विशद केला.
“श्रीराम हे पूजनीय देव तर आहेतच पण त्यांचे विचार जीवनात अंगीकारल्यास आपले जीवन अधिक पवित्र होते .यानंतर भगवान श्रीरामांचे पुष्पाभिषेक करण्यात आले आणि मंदिर परिसरात संकीर्तनाच्या गजरात टाळ-मृदंगाच्या तालावर नृत्य करीत भाविकांनी भावपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व भाविकांसाठी श्री जगन्नाथ महाप्रसाद वितरण करण्यात आला. वरखेड़ी रोडवरील श्रील प्रभुपाद मार्गावर असलेल्या श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा पार पडला.