पाचोऱ्यात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी,आ. किशोर आप्पा पाटील यांनी म.फुलेंचा वारसा पुढे नेण्याचे केले आवाहन

Mahatma Phule Jayanti celebrated with enthusiasm in Pachora, A. Kishor Appa Patil appealed to carry forward the legacy of M. Phule

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – दि.११ एप्रिल शुक्रवार रोजी शहरात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्ताने स्टेशनरोड वरील म. फुले स्मारकावर सकाळी साडे दहा वाजता आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाला बहुजन समाजातील पदाधिकारी, सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समाज परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत, त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आणि सामाजिक समता आणि एकतेचा संदेश आणि महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा देत सर्व स्तरांवर त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले . तर सायंकाळी पाचोरा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच कृष्णापुरी पासून ते फुले स्मारकापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. उत्सवामध्ये तमाम समाज बांधवांनी व बहुजन समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. मधुर खान्देश वृत्तपत्राच्या प्रतिनिधींकडून काढण्यात आलेले फोटो या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button