श्री.गो.से.हायस्कूल मध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
Mahatma Phule Jayanti celebrated with enthusiasm at Shri.Go.Se.High School

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्याश्री.गो.से.हायस्कूल येथे आज दिनांक ११ एप्रिल शुक्रवार रोजी थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील. व मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्याअर्पण करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. आर.एल.पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे,सौ. अंजली गोहिल मॅडम, श्री.आर. बी. तडवी, कार्यालय अधीक्षक श्री.अजय सिनकर तसेच सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


