दोन वर्षात बाबरमाचीचा बँकक्लाँक भरून काढणार….आ.मनोजदादादा घोरपडे…. बाबरमाची येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन आणि उदघाटन संपन्न ……

कराड : विद्या मोरे गेली पंचवीस वर्षात बाबरमाची गावचा विकासकामाचा जो बँकक्लाँक राहिला आहे तो येत्या दोन वर्षात भरुन काढणार आहे. पुर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पाच दहा लाख रुपये देऊन लोकांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. परंतु मला लाखात नव्हे तर कोटीत मागा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची क्षमता ठेवावी लागेल असे प्रतिपादन कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोजदादा घोरपडे यांनी बाबरमाची येथे विविध विकास कामांच्या भुमिपुजन आणि उदघाटन आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय कदम , महेशबाबा जाधव, पै.
हिंदकेसरी संतोष वेताळ,,राहुल पाटील पार्लेकर,कामगार नेते नवनाथ पाटील,शिवसेनेचे विनायक भोसले,बाबुराव धोकटे व्हा चेअरमन कोयना दुधसंघ,अशोक नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे आ घोरपडे म्हणाले ग्रामपंचायतीला विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मर्यादा येतात. आज केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी पंचायत ही महायुतीच्या विचाराची असावी म्हणून महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.बाबरमाची गावचा विकास निधी चार महिन्यातच कोटीचा आकडा पार केला आहे. आपण सामान्य माणसांची कामे करताना कधीही पक्ष पार्टी बघत नाही. कोणाचेही कसलेही काम असूदे अगदी फोनद्वारे संपर्क साधला तरी आपण त्यांचे काम करत असतो. माझ्याकडे काम करताना पुर्वीच्या लोकप्रतिनीधीप्रमाणे कोणाच्याही शिफारशीची, मध्यस्थीची गरज नाही. अशी माझ्या कामाची पद्धत आहे.
यावेळी नवनाथ पाटील ,संतोष वेताळ, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कदम यांनी केले यावेळी शिवाजी डुबल, सतिश डांगे, अतुल पवार, संभाजी पिसाळ, यशवंत डूबल, अरविंद यादव, नावडकर, मोहन चव्हाण, निलेश डूबल आदी ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

बिनकामांच्या माजी आमदारामुळे कराड उत्तर विकासापासून खूप मागे आहे त्याला मुख्य प्रवहात येण्यासाठी भरपूर काम करावे लागणार आहे. प्रमुख रस्त्याची व सिंचन प्रकल्पांची कामे जवळपास मार्गी लावण्यात यशस्वी झालो असून येणाऱ्या दिवसांमध्ये गावातील अंतर्गत कामांवर भर द्यावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button