Akola news:राष्ट्रीयस्तर खेळाडूचा ठाणेदारांच्या हस्ते सत्कार
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट : राष्ट्रीयस्तर खेळाडू रितू प्रकाश मासोदकर यांचा अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नरहरी नगर येथील निवासी प्रकाश मासोदकर यांची कन्या रितू हिने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीयस्तर दहा मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत गोल्ड टीम मेडल प्राप्त केले. ती श्री शिवाजी कॉलेज मधे बि. ए. प्रथम ची विद्यार्थिनी असून खेळात रुची ठेवते. रितूचे वडील मोटर मेकॅनिक चा व्यवसाय करतात. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील भाऊ तसेच नवनाथ उबाळे सर तथा दिपाली रंदे मॅडम यांना देते.अकोट शहर पोलीस स्टेशनचा नवरात्र निमित्त नऊ कन्यारत्नांचा सत्कार करण्याचा मानस होता त्यापैकी प्रथम कन्यारत्न रितू मासोदकर यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.