पाचोरा न्यायालयात दि लॉयर्स असो.तर्फे म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Pachora Court The Lawyers' Association M. Phule, Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Sajri

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लाॅयर्स असोशीएशन तर्फे म. ज्योतिबा फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पाचोरा
साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष सरकारी वकील सौ. मीना सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री.एस. व्ही. निमसे साहेब, पाचोरा प्रांत अधिकारी श्री. भुषण अहीरे, दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन अध्यक्ष ॲड. अभय पाटील, ॲड. शांतीलाल बापू सैदाणे, ॲड. एस पी पाटील ॲड. अण्णासाहेब देशमुख, उपाध्यक्ष रवींद्र ब्राह्मणे , सचिव सुनील सोनवणे. अँड.अंकुश कटारे, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. मुबारक पठाण,ॲड. करूणाकर ब्राम्हणे उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती श्री.निमसे साहेब, ॲड.एस.पी.
पाटील,ॲड.शांतीलाल बापु सैदाणे, ॲड.अनिल पाटील, चिमुकला वक्ता चि.सनी, ॲड. मीना सोनवणे यांनी डॉ.बाबासाहेब आणि म. ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातील विचार व्यक्त केले. त्यानंतर बाबासाहेब व शिवराय यांच्या प्रतीमेसह प्रबोधनकार ठाकरे यांच्या,” देवळाचा धर्म आणी धर्माची देवळे” या पुस्तकातचेही वाटप करण्यात आले. नंतर सर्व वकील बांधव यांनी बाईक रॅली काढुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
पाचोरा न्यायालयात स्थापनेपासून आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले महापुरुषांची जयंती साजरी केली जात नव्हती त्याची सुरुवात पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून ॲड.अंकुश कटारे,ॲड. मुबारक पठाण, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. रविद्र ब्राम्हणे, ॲड. सुनील सोनवणे, अध्यक्ष ॲड. अभय पाटील यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी ॲड. रणसिग राजपुत, ॲड. बापुसाहेब सैदाणे, ॲड. रवी राजपुत, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. मानसिगं सिध्दु, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड. रोशन, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. गोपाल पाटील , ॲड. अविनाश सुतार, ललित सुतार, ॲड. राजेंद्र वासवानी, ॲड. पवन अहीरे, ॲड. रोहीत ब्राह्मणे, ॲड. अमोल म्हस्के
ॲड. रणजीत तडवी, ॲड. तुषार नैनाव आदि वकील बांधवांसह न्यायालयातील केसवॉच पो. दिपक पाटील ,विकास पाटील, रवी पाटील सह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अभय पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button