खोडजाईवाडी – परिवर्तनातून शाश्वत विकास माहितीपटाचे लोकार्पण व यशदाचे प्रवीण प्रशिक्षक शरद गाडे यांचा सत्कार
Khodjaiwadi - Inauguration of Parivartantoon Eternal Development Mahitpatache and felicitation of Yashdache's expert trainer Sharad Gade.
कराड:विद्या मोरे
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा आणि जल जीवन मिशन अंतर्गत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या विषयांवर आयोजित प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी खोडजाईवाडी – परिवर्तनातून शाश्वत विकास या माहितीपटाचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर माहितीपटाचे लेखन, संकलन व निर्मिती करणारे तसेच यशदाचे प्रवीण प्रशिक्षक शरद गाडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कौतुकाचे उद्गार काढले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ अजय राऊत, मनुष्यबळ विकास सल्लागार राजेश भोसले, श्री मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी, गारगोटीचे प्रकल्प व्यवस्थापक शकील मुजावर तसेच प्रवीण प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरत असून, शाश्वत विकासासाठी गावपातळीवरील सहभाग व जनजागृती वाढण्यास मदत करणारा ठरला आहे.