सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू
Suttivar aaye jawancha vihirit paay ghasrun padlyane budoon death!
आबा सूर्यवंशी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी – २४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
सैनिक रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८ वर्ष) असे मयत जवानाचे नाव असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी व आसाम रायफल शिलाँग येथे नोकरीस होता. हा जवान दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ गोपाल पाटील हा सकाळी ११ वाजता शेतात गेला असता विहिरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने आणि घटनेची वार्ता गावात पोहोचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. रविंद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढले. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी तपासून मयत घोषित केले. जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी प्रांत विभाग व तहसिल विभागातर्फे निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश चव्हाणके, छ.संभाजी नगर येथुन ९७ तोफखाना ब्रिगेड चे पथक नायब सुबेदार श्री. बेलगाम आमदार पुत्र सुमित पाटील उपस्थित होते. मुलगा पियूष व वडिलांनी अंत्यविधी केला.