डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित् सिद्धार्थ लेझीम मंडळातर्फे शवपेटीचे लोकार्पण

Siddharth Lezeem Mandal dedicates coffin to the public on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनीधी) – शहरातिल नागसेन नगर पाचोरा येथील सिद्धार्थ लेझीम मंडळ व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण समाजासाठी शववाहिका अर्पण करण्यात आली. नागसेन नगर येथील मैदानावर आयोजित लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक पृथ्वीराज लोंढे, माजी नगरसेवक व काँग्रेस नेते ॲड .अविनाश भालेराव, माजी नगरसेवक अविनाश साबळे, आरपीआय नेते भालचंद्र ब्राह्मणे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, आरपीआय अध्यक्ष शशिकांत मोरे, माजी नगरसेवक महेंद्र खेळकर, सिद्धार्थ लेझीम मंडळाचे अमोल पवार, लखन वाघ, जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम बागुल, खजिनदार आकाश बनसोडे, सचिव चंदू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ लेझीम मंडळ व जयंती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामध्ये अनिल जोगडे, रवींद्र सोनवणे, अशोक गायकवाड, विकास शेजवळ, शुभम तांबे, कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर, जय सपकाळे, संतोष खैरनार, भैया बाविस्कर, सागर खरे, निलेश जाधव, राजू दाभाडे, वाल्मीक गायकवाड, भैया गायकवाड, दादा भिवसने, मुकुल जैन, खंडू सोनवणे, अनिल लोंढे, किरण सोनवणे, किशोर बागुल, मंगल पवार, आप्पा राजू अहिरे, भाऊराव पवार, चिंटू नरवाडे, भैय्या खेडकर, प्रकाश दिवसेने, संतोष पवार, राजू सोनवणे, भरत पवार, नाना खेळकर, संदीप गायकवाड, सुरज महिरे, सुरेश मोरे, दीपक जाधव, संदीप पवार, पप्पू जोगडे, जयेश अहिरे, सुरज अहिरे, गौरव साठे, सिताराम खैरनार यांचा सहभाग उल्लेखनीय होता.या उपक्रमामुळे नागसेन नगरसह पाचोरा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे समाजसेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी सिद्धार्थ लेझीम मंडळाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button