आटके येथे बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकात भीती
कराड विद्या मोरे
आटके (ता. कराड) येथे बिबट्याचा वावर, गावात भीतीचे वातावरण, रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आटके ते आटके टप्पा रस्त्यावर पैलवान इंद्रजीत शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळून बिबट्या वसंतराव पाटील यांच्या शेतात गेला आहे. याचवेळी सुधीर पाटील हे आपल्या मोटर सायकल वरून चालले होते. त्यांच्या समोरच बिबटया रस्ता ओलांडून वसंतराव पाटील यांच्या शेतात गेला.हे चित्र पैलवान इंग्रजीत पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. बिबट्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वीच आटके गावच्या जाधव मळा वस्तीत बिबट्या व दोन पिल्ले दिसल्याचे ग्रामस्थांनीं सांगीतले.तर आज दिसलेल्या बिबट्या हा नर असावा व जाधव मळीतील दोन पिल्ले व मादी असावी असा अंदाज येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या वनविभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.अशी माहिती गावचे पोलीस पाटील जयवंतराव काळे यांनी दिली.आटके गावाच्या परिसरात दोन्ही ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे व नर मादीसह दोन पिल्लांचा वावर असल्याची चर्चा रंगल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी भीती न बाळगता दक्षता घेऊन रहावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.