भारतीय जनता पार्टीचे नगरदेवळा व पिंपळगाव मंडल अध्यक्ष घोषित

Bharatiya Janata Party declared Nagardevala and Pimpalgaon Mandal President

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे संघटनपर्व अंतर्गत नगरदेवळा मंडलाच्या अध्यक्षपदी गोविंद चंद्रकांत शेलार तर पिंपळगाव मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. शोभाताई शांतीलाल तेली यांची निवड धनंजय सुकदेव मांडोळे जिल्हा सरचिटणीस जळगाव पश्चिम यांनी पाचोरा येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घोषित केली.
सदर निवड हि पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या प्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकिचे सूत्रसंचलन जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे यांनी केले. या प्रसंगी पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संघटनपर्व अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य,सक्रिय सदस्य नोंदणी,बुथसमिती गठन करण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती. त्यातीलच मंडल अध्यक्ष निवड हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पद्धतीने मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सदर निवडीबद्दल महाराष्ट्राचे मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, संघटनमंत्री रविजी अनासपुरे,आमदार मंगेशदादा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज, जिल्हा निवडणूक अधिकारी नंदुभाऊ महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,मा. जिल्हा परिषद सदस्य डी. एम. भाऊसाहेब पाटील, माजी सभापती सुभाष पाटील,प्रदेश कार्यकारीणी निमंत्रित सदस्य अमोल नाना पाटील यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे अभिनंदन केले.
सदर बैठकीस कांतीलाल जैन, रमेश वाणी, डॉ. शांतीलाल तेली, हिम्मतसिंगनिकुंभ माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख, नंदू सोमवंशी, शहराध्यक्ष, विनोद महाजन, योगेश माळी, संजय जेरवाल, बापू चौधरी, गणेश पाटील, गोकुळ राठोड, स्वप्निल पाटील, संजय पाटील, प्रदीप पाटील आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर काटे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button