नागपूर विभागाचे एसीबी पोलिस अधीक्षक सचिन कदम यांचा १ मे रोजी पदक देऊन सन्मान महा.राज्य पोलीस महासंचालक ( मुंबई) रश्मी शुक्ला मॅडम यांच्या हस्ते गौरव !

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

पाचोरा -महाराष्ट्रात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते.पोलिस अधिकारी श्री. सचिन कदम यांनी पाचोरा येथे कोरोना काळात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून एक महिन्याच्या कारकिर्दीत अनेक गुन्हेगारांना अटक केली होती. तसेच मोटरसायकल बिना कागदपत्र. बिना लायसनचे ट्रिपल सीट चालवणारे व्यक्तींना त्यांनी दंडात्मक कारवाई करून शासनाला लाखोचा महसूल दंडात्मक स्वरूपात वसूल केला होता. त्यानंतर त्यांची अकोला ग्रामीण पोलीस उपधीक्षक पदी नियुक्ती झाली होती तेथेही त्यांनी गुन्हेगारांचा योग्य तपास करून त्यांनी अटक केली होती.त्यांची नागपूर एसीबी पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली असता त्यांनी हिट लिस्ट वर असलेल्या गुन्हेगारांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई केली. आपल्या कारकीर्दीत केलेल्या योग्य तपासाचा महाराष्ट्र पोलीस खात्यातर्फे त्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून त्यांना १ मे पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे . हा सन्मान व पदक महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रेश्मा शुक्ला यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button